अबब…17 सेकंदांत 50 अंडी फस्त !!!

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे नाव तुम्ही ऐकले असेल ! या विक्रमग्रंथामध्ये नाव नोंदवले गेलेल्या व्यक्‍तींचे “कर्तृत्त्व’ पाहिले तर थक्‍क व्हायला होते ! कुणी वर्षानुवर्षांपासून नखे न कापता जगातील सर्वांत लांब नखे असणारी व्यक्‍ती म्हणून “नावलौकिक’ मिळवतो, तर कुणी दीर्घकाळ रक्‍त गोठवणाऱ्या बर्फात राहतो ! असले अचाट साहस करण्याची कल्पनाही तुमच्या-आमच्यासारख्यांना करवत नाही. मात्र काही जण आव्हान म्हणून हे साहस करतात; तर काही जण प्रसिद्धी मिळवण्याच्या ध्यासाने पछाडलेले असतात. हल्ली सोशल मीडियामुळे अशा साहसवीरांची माहिती सर्रास उपलब्ध होऊ लागली आहे. अनेक लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी वाट्टेल ते करण्यास तयार असतात हे यातून समोर आले आहे. हे करताना प्रसंगी जीवावर बेतण्याची शक्‍यता असते. तरीही ते अशा प्रसंगांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करतात. असले साहस करणाऱ्यांमध्ये चीनी नागरिकांचा हातखंडा आहे. 

मध्यंतरी, चीनमध्ये एका तरुणाने अवघ्या 17 सेकंदांत 50 अंडी खाण्याचे धाडस दाखवले. 50 अंडी तीसुद्धा अवघ्या 17 सेकंदांत फस्त केली, हे काहीसे न पटणारे असले तरी असे धाडस चीनमधील एका तरुणाने केले. मध्यंतरी यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये तो तरुण कच्ची अंडी फोडून पीत होता. त्याने केवळ 17 सेकंदांत तब्बल 50 अंडी गट्टम केल्याचे या व्हिडीओत दिसते. 50 अंडी फोडून त्यातील पातळ पदार्थ मोठ्या पाच मगमध्ये ठेवण्यात आले होते.या महाभागाने अवघ्या 17 सेकंदांत सर्वच्या सर्व 5 मग एकापाठोपाठ रिकामे केले. यासंबंधीचा व्हिडीओ सुमारे 61 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला. एकाच वेळी इतक्‍या मोठ्या प्रमाणात अंडी फस्त केल्याने त्याच्या आरोग्यावर नेमका कोणता परिणाम झाला, याची मात्र माहिती मिळू शकली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)