अफगाणिस्तानात दोन स्फोट ; २० जण ठार 

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये झालेल्या दोन स्फोटांमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. पहिला स्फोट शशदारक परिसरात झाला. त्यानंतर दुसरा स्फोट हा त्याच परिसरातील एनडीएस गुप्तचर कार्यालयाजवळ झाला. या स्फोटात एएफपी या वृत्तसंस्थेचे छायाचित्रकार मराई शाह हे ठार झाले आहेत. याशिवाय या स्फोटात दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.

दोन्ही स्फोट आत्मघाती हल्लेखोरांनी केल्याची माहिती काबूल पोलिसांच्या प्रमुखांचे प्रवक्ते हशमत स्टानेकझई यांनी दिली. यातील पहिला आत्मघाती हल्लेखोर दुचाकीवरुन आला होता. या हल्ल्यानंतर काही पत्रकार वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. यावेळी दुसरा हल्लोखोर पत्रकारांजवळ उभा होता. त्यानं हा स्फोट घडवून आणला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)