अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट; 31 जणांचा मृत्यू, 50 जखमी

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये मतदार आणि ओळखपत्र नोंदणी कार्यालयाबाहेर आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात 31 जण ठार तर  50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे देशात 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी सुरक्षेबाबतची चिंता वाढली आहे.

टोलो न्यूज या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट केंद्राच्या प्रवेशद्वारावर घडला. हा आत्मघातील हल्ला होता. त्यात अनेकांचा बळी गेला, असे काबूल पोलिसांचे प्रमुख दाऊद अमीन यांनी सांगितले. तर सध्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)