अफगाणिस्तानच्या संघात चार स्पिनर्सचा समावेश 

एकमेव कसोटीसाठी संघ जाहीर 
नवी दिल्ली – अफगाणिस्तान संघाला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाल्यानंतर त्यांच्याशी कसोटी सामना खेळण्याची तयारी दाखविणारा भारत हा पहिला संघ होता. आपल्या पहिल्यावहिल्या कसोटी सामन्यासाठी अफगाणिस्तानने संघ जाहीर केला असून या संघात त्यांनी चार फिरकी गोलंदाजांचा समावेश केला आहे. अफगाणिस्तान संघ आपली पहिलीवहिली कसोटी येत्या 14 जूनपासून भारताविरुद्ध खेळणार असून यासाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात मुजीब उर रेहमान, डावखुरा ऑफस्पिनर अमीर हमझा, लेगस्पिनर रशीद खान आणि डावखुरा फिरकी गोलंदाज झहीर खान या चार फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे. ज्यातील मुजीब आणि रशीद यांनी आयपीयलच्या अकराव्या मोसमात आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. तर झहीरला दुखापतीमुळे यंदाच्या मोसमात खेळता आले नव्हते.

यातील हमझाने स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वात जास्त बळी मिळवत राष्ट्रीय संघात स्थान मिळविले आहे. तसेच या संघातील वेगवान गोलंदाज वफादार हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. तर त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज दौलत झादरान जायबंदी आहे. भारतातील एकमेव कसोटी सामाना झाल्यानंतर अफगाणीस्तानचा संघ बांगलादेश येथे टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी जाणार असून त्याही संघाचे नेतृत्व असगर स्तानिकझाई याच्याकडेच देण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अफगाणिस्तानचा कसोटी संघ – 
अझगर स्तानिकझाई (कर्णधार), जावेद अहमदी, इहसानुल्लाह, मोहम्मद शहझाद (यष्टीरक्षक), मुजीब उर रेहमान, नासिर जमाल, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी, अफसर झाझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, आमिर हमझा, सय्यद शिरझाद, यामिन अहमदझाई, वफादार व झहीर खान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)