अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यावर चाकूने वार

पुणे – पूर्वी झालेल्या भांडणातून अफगाणिस्तान देशातील दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या अफगाणिस्तान येथीलच एकावर चाकूने वार करून त्याला गंभिररीत्या जखमी केले. कोंढवा खुर्द येथील एनआयबीएम रोडवर बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
अहमदजान नज्मोद्दिन नज्म (वय 26, रा. सर्वोदय सोसायटी, एनआयबीएम रोड, कोंढवा मूळ अफगाणिस्तान) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी रिदवान आजीजी (वय 24, रा. कोंढवा खूर्द) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अफगाणिस्तानमधील निमातुल्ला अहमदी आणि मंजुर अहमद या युवकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यार्दी त्याचा मित्र आणि दोघे आरोपी हे मुळचे अफगाणिस्तान येथील आहेत. ते पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहेत. आरोपी निमातुल्ला, मंजुर अहमद आणि फिर्यादी रिदवान आजीजी यांच्यामध्ये पूर्वी भांडणे झाली होती. बुधवारी दि. 25 जुलै रोजी रात्री अहमदजान नज्म हा त्यांचे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीसोबत कोंढव्यातील एनआबीएम रोड येथे गेला होता.
लॅटीट्युड सोसायटी समोरील रस्त्यावर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा दोघा आरोपींसोबत वाद झाल्याने दोघा आरोपींनी नज्म यांना शिवीगाळ करीत मारहाण केली तसेच चाकूने वार करून त्याला गंभीररित्या जखमी केले. या प्रकाराची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फरार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक पंकज पवार हे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)