अफगाणिस्तानचा तालिबान्यांवर एअर स्ट्राईक, २३ दहशतवादी ठार

काबूल – अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाने तालिबानी अतिरेक्यांच्या तळावर एअर स्ट्राईक केला आहे. या कारवाईमध्ये 23 अतिरेकी ठार झाल्याची माहिती तिथल्या माध्यमांनी दिली आहे. कंदाहर, गझनी, बदघीस या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

कंदाहरच्या अरगिस्तान परिसरामध्ये 10 आतंकवादी ठार आणि 2 जखमी तर गझनीच्या अंदार जिल्ह्यात 3 दहशतवादी आणि बदघीस जिल्ह्यात 10 दहशतवादयांना ठार करण्यात यश आल्याची माहिती तेथील खामा प्रेस न्यूजने दिले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अफगाणिस्तानचे राजकीय वातावरण अस्थिर असून, कायदा आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या सगळ्यात तिथल्या वेगवेगळ्या दहशतवादी गटांचा सहभाग वाढतोय. त्यामुळेच या तालिबानी दहशतवाद्यांविरोधात अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाने हा हवाई हल्ला केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.