अपशिंगेत उन्हाळी प्रशिक्षण शिबिर उत्साहात

नागठाणे – आधुनिक शिक्षण प्रसारक मंडळ नवी मुंबई, संचलित ए. एस. पी. कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल अपशिंगे (मि.) ता. जि. सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 5 मे 2018 ते 20 मे 2018 या कालावधीत आयोजित करण्यात आलेले एएसपी समर कॅंम्प उन्हाळी प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. त्यामध्ये कुस्ती, कराटे, मल्लखांब, रोप मल्लखांब, तायक्वॉंदो, मर्दानी खेळ लाठीकाठी, रायफल शुटिंग, आर्चरी (धनुर्विद्या), टग ऑफ वॉर (रस्सीखेच), योगा अशा विविध राष्ट्रीय खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले.

या कॅम्पमध्ये जिल्ह्यातील अनेक भागांतून 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय खेळाडू एनआयएस कुस्ती कोच अमर कणसे तसेच ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव व मेजर ध्यानचंद पुरस्कार विजेते अमोल सावंत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. दि 5 मे ते 20 मे या कालावधी विविध खेळांविषयी आधुनिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण निकम यांनी संस्कार शिबिरे घेतली. व्यसनमुक्ती या विषयावर तेजस माने व तायक्वांदो खेळाविषयी फलटण तालुक्‍याचे विस्तारआधिकारी झेंडे यांचे तर आरोग्यविषयी व आहाराबाबत विजय खंडाईत यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सांगता व समारोह वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, आधुनिक शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन व एएसपी. कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलचे मॅनेजिंग डायरेक्‍टर महेंद्र निकम यांच्या हस्ते सर्व सहभागी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व शुभेच्छा देण्यात आल्या. शाळेचे उपशिक्षक दत्तात्रय भिसे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे व पाहुण्यांचे आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)