अपघातग्रस्त कुटुंबास वॉकरसह आर्थिक मदत

आळंदी- अज्ञात वाहनाने गेल्या आठवड्यात आळंदी येथील रहिवासी अंकुश शिंदे हे पत्नीसह निघाले होते. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने या अपघातात शिंदे यांची पत्नी गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, घरची परिस्थिती हालाकीची असल्याने रुग्णालयाचा खर्च त्यांना पेलवत नव्हता. याबाबत आळंदीतील सामाजिक कार्यकर्ते व अविनाश बोरूंदिया यांना समजल्यानंतर बोरुंदिया मित्र परिवाराचे सर्वेसर्वा अविनाश बोरूंदिया यांनी अंकुश शिंदे यांच्या पत्नीस एक वॉकर व आर्थिक मदत करून समाजकार्यास हातभार लावल्याने शिंदे कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)