अपंगत्वावर मात करत झाले नायब तहसीलदार

सातारा ः मुलगा डॉ. अभिजीत गुरव यांच्यासमवेत नंदकुमार गुरव.

आरफळच्या नंदकुमार गुरव यांची प्रेरणादायी प्रवास

गुरुनाथ जाधव
सातारा, दि. 30 – अपंगत्वावर मात करत लिपिक ते नायब तहसीलदार पर्यंतचा प्रवास करणाऱ्या नंदकुमार सुदाम गुरव यांची संघर्षकथा युवकांसाठी प्रेरणादायी आहे. आरफळ, ता. साताराचे गावचे मूळचे रहिवासी गुरव यांनी आर्थिक अडचणींचा सामना करत परिस्थितीवर जिद्दीने मात केली. आज पुणे विभागीय महसूल समन्वय समितीचे अध्यक्ष, पतसंस्था फेडरेशनचे डायरेक्‍टर, म्हणून ते काम पाहत आहेत. गुरव समाजाच्या विविध अडचणी समस्या सोडवण्याकरिता त्याचे संघटन देखील करत आहेत.
एकत्र कुटुंबात गाव रहाटी त्याच्या रीती पाळताना कायमच मध्यवर्ती भूमिका घावी लागायची. सर्वांना एकसंघ ठेवण्याच्या कौशल्याल्यामुळे 1992 साली सातारा जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचा लिपिकातील पहिला अध्यक्ष होण्याचा त्यांनी मान मिळवला. दरम्यानच्या काळामध्ये सेवकांच्या सोसायटीचा संचालक बनून 25 वर्ष सहकार संघटनेची धुरा सांभाळली. मोठे भाऊ बाळासाहेब कृषी खात्यात तर नंदकुमार यांनी तहसील कार्यलयात नोकरी मिळवून शेतकरी असलेल्या आई वडिलांचे स्वप्न खरे केले. नंदकुमार हे अपंग असले तरी कधी खचले नाही. आरफळ गावातून सातारला येऊन जाऊन शिक्षण पूर्ण केले. आई शेती सांभाळायची तर वडील त्याच्या सोबत किराणा मालाचे दुकान गावात चालवाचे. त्याच्या सोबत दुकान सांभाळत सर्व शिक्षण पूर्ण केले. शारीरिक अपंगत्व असले तरी कधी त्याचा बाऊ केला नाही. सर्व प्रकारची कष्टाची कामे आज देखील करतात असे नंदकुमार यांनी सांगितले.
पत्नी शांता गुरव हिने आपला संसार सुखाचा करताना मुलांचा व कुटुंबाचा चांगला सांभाळ केला. दोन मुली व एक मुलगा असा परिवार त्याना उच्च शिक्षित बनवण्यासाठी कायमच त्यानी कष्ट घेतले. दिनदुबळ्यांची सेवा या व्रताचा अवलंब मुलगा डॉक्‍टर अभिजित करत असल्याचे पाहून आनंद होतो. त्याचे एमडी होमीओपॅथी शिक्षण झाले. त्याचे कॅलिनीक तो चालवतो. नाटक दिगदर्शन, उत्तम कविता हे त्याचे छंद आजही जोपासले आहेत. जन्मठेप या नाटकामध्ये अपंग असल्याने प्रमुख व्यक्तिरेखा त्यानी साकारली होती. दुसऱ्यावर अवलंबून असणे व त्याचा त्रास हे नाटकामध्ये अभिनयातून साकारले होते. त्याचा सारथी नावाचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)