Video : …अन् भरधाव फॉर्च्यूनर हॉटेलात शिरली

– पिंपरी-चिंचवड मधील सांगवी येथील घटना

पिंपरी – सांगवी परिसरात भरधाव फॉर्च्यूनर मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याशेजारी असलेल्या एका हॉटेलमध्ये घुसली. या अपघातात हॉटेलमधील एकाचा मृत्यू झाला असून चारजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (सोमवारी) दुपारी एक वाजताच्या सुमारास सांगवीतील फेमस चौकात घडली. हा अपघात सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.

ओमप्रकाश अंबादास पंदिनवार (वय 60) यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर बसवराज तळपते (वय 50), सचिन जाधव (वय 40), सुवर्णा ओमप्रकाश पंदिनवार (वय 50, सर्व रा. नवी सांगवी, पुणे) गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ओमप्रकाश हे अनंत भोजनालय हॉटेल चालवतात. दुपारी एकच्या सुमारास फॉर्च्यूनर कार (एम एच 12 के जे 0333) भरधाव वेगात जात होती. कारमधील चालकाचे नियंत्रण सुटले आणि फॉर्च्यूनर कार थेट अनंत भोजनालय या हॉटेलमध्ये घुसली. अचानकपणे कार शिरल्याने तेथील चार जणांना मोटारीची धडक बसली. त्यांच्यापैकी ओमप्रकाश अंबादास पंदिनवार यांचा मृत्यू झाला असून अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)