…अन्‌ प्रियांकाने उरकला साखरपुडा

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे आपल्या कथित प्रेमप्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. त्यातच या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. या दोघांचा साखरपुडा झाल्याच्या वृत्ताला अनेक परदेशी माध्यमांनी दुजोरा दिला आहे.

या संदर्भात “पिपल’ मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या आठवड्यातच निक आणि प्रियांकाचा साखरपुडा झाला असून प्रियांकासाठी सर्वात आलिशान टीफिनी ब्रॅंडची अंगठीही निकने खरेदी केली असल्याचे संबधित मासिकाने दिलेल्या आपल्या वृत्तात म्हटले आहे. हे जोडपे आता ऑक्‍टोबरमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचेही वृत्त आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रियांका आणि निक एकमेकांना वर्षभरापासून डेट करत असून प्रियंका आणि निक हे 2017मध्ये मेट गालाच्या इव्हेंटमध्ये पहिल्यांदा दिसले होते. या दोघांच्या नात्याची चर्चा तेव्हापासून होती. प्रियांकाने त्यावेळी वेगळेच कारण सांगत वेळ मारून नेली होती. पण हे जोडपे मे 2018 पासून अनेकदा न्यूयॉर्कमध्ये एकत्र वेळ घालवताना दिसले तेव्हापासून निक आणि प्रियांकाच्या नात्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा झाली. पण, आपल्या नात्याला दोघांही कधीही अधिकृतरित्या दुजोरा दिला नाही. पण या दोघांनी साखरपुडा उरकला असल्याच्या बातम्यांना अनेक परदेशी माध्यमांनी अधिकृत दुजोरा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)