… अन्यथा मोशी, चांडोली टोलकाने शिवसेना स्टाईलने बंद

खेड तालुका शिवसैनिकांचा निवेदनाद्वारे इशारा

राजगुरूनगर: पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण व राजगुरूनगर शहरातील अतिक्रमणे काढण्याची व सेवा रस्ते, साईडपट्ट्या दुरुस्त कराव्यात, अन्यथा मोशी व चांडोली येथील टोलनाके शिवसेना स्टाईलने बंद करण्यात येतील, असा इशारा निवेदनाद्वारे खेड तालुका शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. हे निवेदन शिवसैनिकांनी सहाय्यक जिल्हाधिकरी आयुष प्रसाद यांना दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजगुरूनगर, चाकण येथील पुणे-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. वाहतूककोंडीला अडथळे असलेल्या महामार्गावरील साईपट्ट्या व सेवा रस्त्यांची दुरवस्था झाली असून महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, साईडपट्ट्या उखडल्या असल्याने दुचाकींचे अपघात होत असूनही महामार्ग प्राधिकरणकेवळ टोलचे पैसे घेण्यात गुंग असून महामार्गावरील सोयी-सुविधांकडे लक्ष देत नाही. तरी महामार्गाची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा मोशी व चांडोली येथील टोलनाके शिवसेना स्टाईलने बंद करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने आयआरबी, पुणे-नाशिक महामार्ग प्राधिकरण, सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला असून हे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे, तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर, उपतालुका प्रमुख किरण गवारे, शाखा प्रमुख कैलास गोपाळे, संतोष गार्डी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

राजगुरूनगर : पुणे-नाशिक महामार्गावर पडलेले खड्डे, साईडपट्ट्या दुरुस्ती आणि महामार्गावरील सर्विसरस्ते दुरुस्त करण्याच्या मागणीचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देताना शिवसैनिक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)