…अन्यथा मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकू!

तळेगाव दाभाडे – येथील शहरातील जिजामाता चौक ते गणपती चौक या मार्गावर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माध्यमातून रस्ते रुंदीकरणाचे काम सुरु आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अतिक्रमणाच्या येणाऱ्या घराच्या पायऱ्या आणि ओटे काढून घेतले आहेत. मात्र, नगरपरिषदेने काम अर्धवट ठेवले आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून हे काम पुर्ण करावे अन्यथा सर्व नगरसेवक नागरिकांना घेऊन मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे लावणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

याबाबत तळेगाव नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने नगरसेवक सुनील शेळके यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शहरातील जिजामाता चौक ते गणपती चौक हा मार्ग शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. या मार्गावर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माध्यमातून रस्ते रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामात येणारे ओटे आणि घराच्या पायऱ्या नागरिकांनी स्वतःहून काढल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रशासनाने रस्त्याचे काम अर्धवट ठेवले असून आता काम बंद पाडले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. नागरिकांना चिखल घेऊन घरात जावे लागत आहे. घराला पायऱ्या नसल्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत प्रशासन कोणतीही खबरदारी घेत नाही. मागील दोन महिन्यापासून नागरिकांना हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घ्यावे. येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करावे. अन्यथा सर्व नगरसेवक संबंधित नागरिकांना घेऊन मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे लावणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)