…अन्यथा नोंद नसलेल्या मिळकतींवर हातोडा : आयुक्‍तांचा इशारा

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्तांची नोंदणी महापालिकेकडे नसलेल्या मालमत्ताधारकांनी येत्या दिवसात करसंकलन कार्यालयाकडे मालमत्तेची नोंदणी करावी. अन्यथा जबरीदंडासह अशा मालमत्तांवर पाडण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. ही कारवाई टाळण्याकरिता नजीकच्या करसंकलन कार्यालयात नोंदणीसाठी लेखी अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पंधरा दिवसांनंतर महापालिका मिळकतींचे सर्वेक्षण करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात सव्वा चार लाखांच्या आसपास मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते. मालमत्ता करातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. परंतु, शास्तीकरामुळे अनेक नागरिक कराचा भरणा करत नाहीत. तसेच शहरातील अनेक अधिकृत, अनधिकृत मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्तेची महापालिकेकडे नोंदणी केली नाही. महापालिकेचा कर बुडविला जातो. त्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकृत, अनधिकृत अशा ज्या मालमत्तांची नोंदणी महापालिकेकडे करण्यात आली नाही. अशा मालमत्ताधारकांनी करसंकलन कार्यालयाकडे मालमत्तेची नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी आयुक्त हर्डीकर म्हणाले की, शहरातील अनेक अधिकृत, अनधिकृत मालमत्ताधारक आपल्या मालमत्तेची महापालिकेकडे नोंदणी करत नाहीत. कर बुडवेगिरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासाठी महापालिका शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार आहे. 2012 मध्ये शहरात केलेल्या मिळकतींच्या या सर्वेक्षणात 66 हजार बिगर नोंदणीच्या मिळती आढळल्या होत्या. या धर्तीवर येत्या पंधरा दिवसांनंतर हे सर्वेक्षण पुन्हा सुरू केले जाणार आहे. त्यामध्ये आढळनाऱ्या बिगर नोंदीच्या मिळकतींवर कारवाई करणार असल्याचे सुतोवाच त्यानी यावेळ िकेले. ही कारवाई टाळण्याकरिता नाद नसलेल्या मालमत्ताधारकांनी येत्या पंधरा दिवसात महापालिकेच्या नजीकच्या करसंकलन कार्यालयाकडे नोंदणीसाठी लेखी अर्ज करावा. महापालिका मालमत्तेची नोंदणी करुन घेईल. त्यानंतर मात्र कारवाई अटळ आहे.

शहरातील थकबाकीदारांना नोटीसा
दरवर्षीपेक्षा यंदा मिळकत कर जास्त वसूल केला जाणार आहे. मिळकत कर वसुलीचे उदिष्ट पुर्ण करण्यात येईल. थकबाकीदारांना नोटीसा देण्याची कारवाई सुरु केली आहे. बड्या थकबाकीदारांची देखील गय केली जाणार नाही. न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणे देखील तत्काळ मार्गी लावली जातील. त्यासाठी वकिलांसोबत बैठक झाली आहे. प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावण्याची सूचना वकिलांना केली आहे. अनेक प्रकरणे मार्गी लागली असून त्यांच्याकडून कर वसूल केला असल्याचेही, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)