…अन्यथा कराड-चिपळूण महामार्गाचे काम बंद पाडू

पाटण : प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सचीन नलवडे, विकास हदवे व इतर.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

नवारस्ता, दि. 6 (वार्ताहर) – भूसंपादन कायदा पायदळी तुडवून शेतकर्‍यांच्या शेतात अतिक्रमण करुन महामार्गाचे काम सुरु आहे.शेतकर्‍यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मुरुमाचा भराव टाकून नुकसान केले आहे. येत्या दोन दिवसात योग्य व्हावा, अन्यथा बाधित शेतकर्‍यांना सोबत घेऊन सदर कराड-चिपळूण महामार्गाचे काम बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबतचे निवेदन पाटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, तालुकाध्यक्ष विकास हादवे, अमर पाटील, दीपक पवार, सुभाष नलवडे, अमर कदम, योगेश झांबरे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, कराड-चिपळूण या मार्गाचे पाटण तालुक्यामध्ये वेगात काम चालू आहे. पाटण तालुक्यामध्ये महामार्गाचे काम चालू असताना महाराष्ट्र शासनाच्या 25 जानेवारी 2017 या नवीन भूसंपादन कायद्याचा एल. एन. टी. कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून भंग केला जात आहे. शेतकर्‍यांना या महामार्गात बाधित होणार्‍या त्यांच्या क्षेत्राचा, पिकांचा, झाडांचा व इतर संपत्तीचा कोणताही मोबदला दिला जात नाही. तामकडे येथील शेतकरी दीपक पवार, हरी पवार व तालुक्यातील इतर शेतकरी या प्रकल्पामुळे बाधित होत असून आजपर्यंत त्यांना कोणतीही नुकसान भरपाई दिली गेली नाही. बाधित होणार्‍या शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला देण्यासाठी 25 जानेवारी 2017 ला शासन निर्णयानुसार बाधित क्षेत्राची भूमीअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करावी तसेच इतर नुकसानीचे पंचनामे करावेत व खाजगी वाटपानुसार सदर शेतकर्‍यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देवून मगच शेतकर्‍यांच्या हद्दीमध्ये महामार्गाचे काम सुरु करावे. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)