अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

कामशेत – अनोळखी वय अंदाजे 40 ते 45 वर्ष वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी (दि. 22) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास साईव्हिला बिल्डिंग, कामशेत (ता. मावळ) येथे घडली.

पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, साईयुज रवींद्र नायर यांनी कामशेत पोलीस ठाण्यामध्ये खबर दिली की, साईव्हिला बिल्डींग जवळच्या पाण्याच्या टाकीजवळ अनोळखी वय अंदाजे 40 ते 45 वर्ष वयाच्या महिलेचा मृतदेह आढळल्याची खबर दिली. घटनास्थळी पोलीस नाईक संतोष शिंदे यांनी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून अकस्मात मयत दाखल केले. मृतदेहाचे वर्णन पुढीलप्रमाणे उंची 4 फूट, 2 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहरा गोल, नाक बसके, अंगात लाल रंगाचा ब्लाउज, हिरवट पोपटी रंगाची साडी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)