अनुष्काने शेअर केले बेबी बंप फ्लॉन्टचे फोटो

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या आपल्या प्रेग्नेंसी पीरियड एंजॉय करत आहे. ती विराट कोहलीसह सध्या दुबईत आहे. अनुष्का शर्माने नुकताच बेबी बंप फ्लॉन्ट करत असतानाचा एक सुंदर असा फोटो शेअर केला आहे. यावर करिना कपूर-खानने “बहादूर’ अशी कॉमेंट केली आहे. करिनाने लिहिले की, “तू सर्वांमध्ये बहादूर आहेस.’ यासोबतच तिने हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

करिना कपूर-खानच्या या पोस्टवरून ती अनुष्काला किती आवडते हे स्पष्ट होते. अनुष्का शर्माने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच तो काही क्षणात व्हायरल झाला आहे. फोटो शेअर करत अनुष्काने पोस्ट केले की, आपण जेव्हा एक जीवन देण्यास तयार होतो, तेव्हा यापेक्षा रियल (वास्तविक) काहीही होऊ शकत नाही.

जेव्हा ते आपल्या नियंत्रणात नसते, तर वास्तव काय आहे?
विराट आणि अनुष्का यांनी ऑगस्ट महिन्यात गुड न्यूज दिली होती. विराटने अनुष्का शर्माचा फोटो शेअर करत लिहिले होते की, “आता, आम्ही तीन होणार! जानेवारी 2021 मध्ये येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.