अनिवासी भारतीयांचे लक्ष घराकडे

2017 मध्ये तब्बल 69 अब्ज डॉलर्स पाठविले

वॉशिंग्टन – विदेशात असणाऱ्या अनिवासी भारतीयांनी गेल्या वर्षात 69 अब्ज डॉलर्स मायदेशी पाठविले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा पहिला क्रमांक असल्याचे जागतिक बॅंकेकडून सांगण्यात आले. मागील वर्षाच्या तुलनेत भारतात पैसे पाठविण्याच्या प्रमाणात 9.9 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 2016 मध्ये देशात पैसे पाठविण्यात घट झाली होती. 2014 मध्ये विक्रमी 70.4 अब्ज डॉलर्स पाठविण्यात आले होते.

जागतिक बॅंकेच्या स्थलांतर आणि विकास विभागाच्या आकडेवारीनुसार अल्प आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांत 2017 मध्ये पैसे पाठविण्याचा एकूण आकडा 466 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. 2016 च्या 429 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत यात 8.5 टक्‍क्‍यांनी वृद्धी झाली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर मायदेशात पैसे पाठविण्याच्या प्रमाणात 7 टक्‍क्‍यांनी वाढ होत 613 अब्ज डॉलर्सवर पोहोचले. 2016 मध्ये हा आकडा 573 अब्ज डॉलर्स होता. युरोप, रशिया आणि अमेरिकेमध्ये विकास होत असल्याने या देशांतून बाहेर पैसे पाठविण्याच्या संख्येत वाढ होत आहे. तेलाच्या वाढत्या किमती आणि युरो, रुबल मजबूत झाल्याने मायदेशी पैसे पाठविण्यात वाढ झाली.

भारतानंतर चीन 64 अब्ज डॉसर्ल, फिलिपाईन्स 33 अब्ज डॉलर्स, मेक्‍सिको 31 अब्ज डॉलर्स, नायजेरिया 22 डॉलर्स आणि इजिप्त 20 डॉलर्स यांचा क्रमांक लागतो. दक्षिण आशियामध्ये पैसे पाठविण्यात 5.8 टक्‍क्‍यांनी वाढ होत 117 अब्ज डॉलर्सवर पोहोचले.

पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये पैसे पाठविण्यात हे प्रमाण स्थिर असून दोन्ही देशांत अनुक्रमे 20 अब्ज डॉलर्स आणि 13 अब्ज डॉलर्स पाठविण्यात आलेत. श्रीलंकेत उणे 0.9 टक्‍क्‍यांनी घसरण झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)