अनाथ असलेली माधुरी बनली वाईच्या वसतिगृहातील मुलांची बहीण

वाई ः वसतिगृहातील मुलांना राखी बांधताना माधुरी गुरव.

वाईच्या एकलव्य वसतिगृहात कार्यक्रमाचे आयोजन
वाई, दि. 28 (प्रतिनिधी)- वयाच्या अवघ्या सात महिन्याची असताना आई -वडिलांचे छत्र हरपले. निराधार झालेल्या माधुरी महेश गुरव हिचे लोणावळा येथे प्राथमिक शिक्षण ही मुलींच्या वसतिगृहात झाले असून ती सध्या कायदे पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. आपल्याला भाऊ नसल्याने गेली तीन वर्षांपासून वाई येथील एकलव्य वसतिगृहातील मुलांना आपले भाऊ मानून त्यांना रक्षाबंधना दिवशी राखी बांधण्याचे काम करत आहे. वाईतील एकलव्य वसतिगृहातील काही मुलांना वसतिगृहाशिवाय कोणाचाही आधार नाही म्हणून तीही निराधार असणाऱ्या मुलांनाच आपला भाऊ मानून राखी बांधण्यासाठी दरवर्षी येत असते. या मुलांमध्ये माधुरी आपला भाऊ शोधत असते.
एकलव्य वसतिगृह वाई येथे सर्व समाजातील विद्यार्थी राहत आहेत. काही विद्यार्थी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन आले आहे. अनेक विद्यार्थ्यांना रक्षाबंधन दिवशी आपल्या घरी जाता येत नाही. गेल्या तीन वर्षांपासून माधुरी गुरव हीच त्यांची बहीण झाली आहे. रक्षाबंधन दिवशी ती सर्व मुलांना आपल्या हाताने राखी बांधून त्या मुलांमध्ये आपल्या भावाचे रूप पाहत आहे. गेल्या तीन वर्षांपासून ती हा उपक्रम राबवित असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असून तिचे समाजातील सर्व स्तरामधून कौतुक होत आहे.

माझे आई -वडिलांचे मी लहान असतानाच छत्र हरपल्याने माझे प्राथमिक शिक्षण मुलींच्या वसतिगृहातच झाले. त्यामुळे वसतिगृहातील मुलांनाच मी आपला भाऊ मानून रक्षाबंधन दिवशी राखी बांधत असते. ही परंपरा कायम ठेवून मला न्यायाधीश होण्याचे माझे स्वप्न आहे.
माधुरी गुरव

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मी पाचवीपासून या वसतिगृहात राहत असून माझे मूळ गाव नाशिक गुजरातच्या सीमेवर असून रक्षाबंधन दिवशी आम्हाला गावी जाता येत नाही. गेल्या तीन वर्षांपासून माधुरीताई आम्हाला राखी बांधत असल्याने आम्हाला आमच्या बहिणीची उणीव भासत नाही.
सुरज खोटरे
विद्यार्थी, एकलव्य वसतिगृह वाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)