अनधिकृत सुरु असलेले शुटिंग वनविभागाने पाडले बंद

12 वाहनांसह कोट्यावधीची मालमत्ता जप्त

महाबळेश्वर, दि. 30 (प्रतिनिधी )- वेण्णा लेक परिसरात रात्रीच्यावेळी अनधिकृतपणे सुरु असलेल्या शुटिंगवर वन विभागाच्या पथकाने धडक कारवाई करुन निर्माते व दिग्दर्शक अमिन सलील हाजी यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या कारवाईत 12 वाहनांसह सुमारे एक कोटीहून अधिक रक्कमेची मालमत्ता जप्त केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निर्माते व दिग्दर्शक अमिन सलिम हाजी (वय 48, सध्या रा. पाचगणी) हे आपल्या आगामी कोई जाने ना या चित्रपटाचे शुटिंग वेण्णा परिसरात रात्रीच्यावेळी करत होते. परंतु, या शुटिंगसाठी त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी काढली नव्हती. याबाबतची माहिती वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड यांना समजातच गायकवाड यांच्या पथकाने धडक कारवाई करत 12 वाहनांसह 1 कोटीहून अधिक रक्कमेची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच अमिन सलिम हाजी यांच्यावर वन विभागाच्या अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेली दोन आठवड्यांपासून रहस्यमय कथा असलेल्या “काई जाने ना’ चित्रपटाचे चित्रीकरण येथील इगल नेस्ट या खाजगी बंगल्यात व परिसरात चालु होते. चित्रपट रहस्यमय असल्याने त्यामध्ये रात्री जंगलामधील काही दृश्‍य आहेत, ही दृश्‍ये चित्रित करण्यासाठी वन विभागाची परवानगी न घेता रात्री साडेआठ वाजता या युनिटने वेण्णालेक पेटीट रोड दरम्यान चित्रिकरण सुरू केले. रात्री दहाच्या दरम्यान ही खबर वन विभागाचे वनक्षेत्रपाल रणजीत गायकवाड यांना मिळाली. त्यांनी आपल्या सोबत वनपाल सुनिल लांडगे, वनरक्षक लहु राऊत, रमेश गडदे, सहदेव भिसे, ज्योती घागरे, संगीता देसाई व विद्या घागरे यांना बरोबर घेवून फॉरेस्ट कंम्पार्टमेंट 73 मधील घनदाट जंगलात चित्रपटाचे शुटींग सुरू असल्याचे दिसुन आले. त्यांनी तातडीने चित्रपटाचे शुटींग बंद पाडले व चित्रपटाचे शुटींगसाठी वापरण्यात आलेली थार, कॉलिस, इनोव्हा, टेम्पो व इरटीगा अशी एकूण 12 वाहने व कॅमेरासह इतर सर्व 1 कोटींपेक्षा अधिकरक्कमेचे साहित्य जप्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)