अनधिकृत शाळांवर महापालिकेची “छडी’

पिंपरी – शहरातील अनधिकृत शाळांच्या बाबतीत महापालिकेने आता कारवाईचा बडगा उगारला असून ज्या अनधिकृत शाळा आहेत. त्यांवर लवकरच कारवाई करणार असल्याचे शिक्षण समिती अध्यक्ष प्रा. सोनाली गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिक्षण समितीने चिंचवड येथील ब्ल्यू रोज या शाळेला भेट दिली असता शाळेत अनधिकृतरित्या प्राथमिकचे वर्ग सुरु असल्याचे निदर्शनास आले. यावरुन संबंधीत शाळेला लवकरच नोटीस बजावण्यात येणार असून अशीच कारवाई शहरातील इतर अनधिकृत शाळांवर करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने शहरात नव्याने पाच परिवेक्षक नेमण्यात आले आहेत म्हणजे एकूण सात परिवेक्षक शहरात फिरुन अनधिकृत शाळांची तपासणी करणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिका दरवर्षी अनधिकृत शाळांची यादी काढते. मात्र त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जात नाही. यावेळी ही प्रशासन कारवाई संदर्भात हतबल असून अनधिकृत शाळांची यादी जरी हातात असली तरी कारवाईचा चेंडू हा महापालिका आयुक्तांकडे प्रशासनाने ढकलला आहे. या कारवाईसाठी महापालिका आयुक्त जो निर्णय घेतील तशी कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण शिक्षण समिती प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे यावेळीही कारवाई होणार की फक्त चर्चाच होणारे पहाणे महत्त्वाचे ठरेल.

राज्य सरकारच्या आदेशानुसार संबंधीत शाळांना सुरवातीला नोटीस बजावली जाते. त्यानंतरही सुधारणा नाही झाली तर दंडाची कारवाई केली जाते. यामध्ये सुरुवातीला एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात येतो. नंतर दिवसाला दहा हजार असा दंड आकारण्यात येतो.
– ज्योती शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण समिती.

मुळात अनधिकृत शाळांना शासन मान्यता मिळतेच कशी, अशी मान्यता शाळांना मिळू नये यासाठी संबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार असून ज्या शाळा आता अनधिकृत आहेत. त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येईल.
– प्रा. सोनाली गव्हाणे, अध्यक्ष, शिक्षण समिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)