अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

File photo

जम्मू-काश्‍मीर – जम्मू-काश्‍मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. अनंतनाग येथे बुधवारी पहाटेपासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. चकमक संपल्याची घोषणा करण्यात आली असली तरी अद्याप परिसरात लष्कराकडून शोधमोहिम सुरू आहे. येथे आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम अजून सुरू आहे.

अनंतनागच्या कोटल्ला मोहल्ला परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षारक्षकांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पहाटेच परिसराला वेढा दिला. सुरक्षारक्षकांनी घेराव घातल्याचे लक्षात येताच दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली. याला सुरक्षारक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांवर हल्ला करण्याआधी सुरक्षारक्षकांनी परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही दिवसांपूर्वी कुपवाडामध्ये पोलीस कर्मचारी सलीम यांचे अपहरण करुन दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली होती. त्यानंतर अवघ्या 24 तासांमध्येच सुरक्षारक्षकांनी सलीम यांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)