अधिष्ठातापदांवर कुणाची वर्णी लागणार?

याकडे सर्वांचे लक्ष

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “मानवविज्ञान’, “वाणिज्य व व्यवस्थापन’ या दोन विद्याशाखा अधिष्ठातापदासाठी नुकत्यात पात्र उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. त्यात या दोन्ही अधिष्ठातापदी नियुक्‍तीची घोषणा लवकरच विद्यापीठामार्फत होणार आहे. त्यामुळे या अधिष्ठातापदांवर कुणाची वर्णी लागेल आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये अधिष्ठातापदांसाठी नियुक्‍ती केली जात आहे. त्यानुसार पुणे विद्यापीठ प्रशासनाने उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. विद्यापीठाने अधिष्ठाता पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार “मानवविज्ञान’, “वाणिज्य व व्यवस्थापन’ या दोन अधिष्ठाता पदासाठी दि. 9 व 10 सप्टेंबर रोजी विद्यापीठात निवड समितीद्वारे मुलाखती घेण्यात आल्या.

विद्यापीठात सध्या अधिष्ठाता पदासाठी कुणाची नियुक्‍ती होणार आहे, याची चर्चा होत आहे. त्यातच मुलाखतीपूर्वीच काही नावे निश्‍चित झाल्याची चर्चा होत आहे. “मानवविज्ञान’ शाखेसाठी नाशिकमधील एका उमेदवाराचे, तर “वाणिज्य व व्यवस्थापन’ या अधिष्ठाता पदासाठी पुण्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या उमेदवाराचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे अधिष्ठातापदी कुणाची नियुक्‍ती होणार आहे, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा या दोन अधिष्ठाता पदासाठी नियुक्‍तीची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here