अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 58 वरून 60

आरोग्य विभाग : राज्यातील “अ’ गटातील 400 वरिष्ठ डॉक्‍टरांना लाभ 

पुणे – एकीकडे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची मागणी होत असताना शासनाने केवळ आरोग्य विभागातील “अ’ गटातील वरिष्ठ डॉक्‍टरांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविले आहे. याचा लाभ राज्यातील चारशे डॉक्‍टरांना होणार आहे. मात्र, यामुळे इतर कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी तसेच इतर विभागांतील अधिकारी यांच्याकडून नाराजी व्यक्‍त केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरोग्य विभागाने नुकताच याबाबतचा शासन निर्णय दिला आहे. त्यामध्ये सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचे कारण वैद्यकीय अधिकारी आणि विशेषज्ञ या पदासाठी प्रयत्न करून देखील पुरेशा प्रमाणात अधिकारी उपस्थित झालेले नाहीत. उपलब्ध झाले तरी पसंतीच्या ठिकाणी पदस्थापना न मिळाल्याने सेवेत रुजू न होण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळे आरोग्य सेवेतील पदे रिक्त राहात असून त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. ही बाब विचारात घेत शासनाने यापूर्वी सप्टेंबर 2015 मध्ये हेच कार्यक्षेत्र असलेल्या अधिकाऱ्यांचे वय 58 वरून 60 केले होते. हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने तीन वर्षांसाठी लागू होता. तसेच, शासनाने परत मे 2018 मध्ये हीच पात्रता असलेल्या अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवला होता. त्याला मंजूरी देण्यात आली आहे. या निर्णयाचा लाभ गट “अ’ मधील वैद्यकिय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि व विशेषज्ञ अशा वेतनबॅंड 15600 ते 39100 असलेल्या अधिकाऱ्यांना मिळाला आहे. हा निर्णय 31 मे 2023 पासून पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे पाच वर्षांसाठी वाढविण्यात आला आहे.

आरोग्य सेवेतील वरिष्ठ आणि गट “अ’ मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वय वाढविण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाने नुकताच मंजूर केला. त्यामुळे राज्यातील जवळपास 400 डॉक्‍टरांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्यात आले आहे.
– डॉ. संजीव कांबळे, संचालक, आरोग्य विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)