अतिप्राचीन कुस्करलेल्या बटाट्याचा शोध…

संग्रहित छायाचित्र

फळे, भाजीपाला यांची निर्मिती निसर्गातून होत असली तरी त्यांमध्ये भौगोलिक दृष्ट्या वैविध्य आढळते. काही भाज्या-फळे ठरावीक ठिकाणीच उगवतात-पिकतात. मात्र माणसाच्या भ्रमंतीदरम्यान त्याने या प्रजाती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्या आणि आपापल्या प्रदेशात त्यांची लागवड केली. त्याचा इतिहास स्पष्टपणाने उपलब्ध नसल्यामुळे आजही अनेक फळे, भाज्या, अन्नपदार्थ यांच्या उगमाबाबत मतमतांतरे आहेत. ती दूर होण्यासाठी संशोधनही होत असते. असले संशोधन करण्यात अमेरिकन आघाडीवर असतात.

आता हेच पहा ना अमेरिकेत यूटा प्रांतात तब्बल 10,900 वर्षांपूर्वीच्या कुस्करलेल्या बटाट्याचा (स्मॅश्‍ड पोटॅटो) शोध लावण्यात आला आहे. ज्या दगडाच्या सहाय्याने उकडलेला बटाटा कुस्करण्यात आला होता त्याच्या भेगांमध्ये या बटाट्याचा स्टार्च सापडला आहे. उत्तर अमेरिकेतील बटाट्याच्या शेतीचा हा सर्वात जुना पुरावा आहे.एका विशिष्ट तंत्राच्या सहाय्याने संशोधकांनी या मॅश्‍ड पोटॅटोचा शोध लावला आहे. याच तंत्राच्या सहाय्याने यापूर्वी दक्षिण इटलीतील 32,600 वर्षांपूर्वीच्या ओटस्चा शोध लावण्यात आला. इस्रायलमध्येही याच तंत्राच्या सहाय्याने 23 हजार वर्षांपूर्वीच्या गव्हाचा, चीनमध्ये 19,500 वर्षांपूर्वीच्या बीन्सचा आणि 23,000 वर्षांपूर्वीच्या कंदाचा शोध लावण्यात आला होता. आता यूटामध्ये प्रागैतिहासिक काळातील दगडी अवजारामध्ये हे स्टार्च सापडले आहे. अमेरिकेतील अनेक मूळ मानवसमूहांच्या आहारात बटाटा वापरत असत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)