अण्णा हजारे यांच्या आंदोलनास देशभक्त पार्टीचा पाठिंबा

पदाधिकाऱ्यांनी घेतली अण्णांची भेट

नगर – भारतीय देशभक्त पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी राळेगण सिध्दी (ता.पारनेर) येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास सक्रीय पाठिंबा दिला. यावेळी देशभक्त पार्टीचे अध्यक्ष ऍड. शिवाजी डमाळे, भाऊसाहेब आंधळे, ऍड.बी.जी. गायकवाड, अशोक कासार, रावसाहेब काळे, प्रसाद अल्हाट, संजय जपकर, दिपक वर्मा, योगेश खेंडके आदि उपस्थित होते.

ऍड. शिवाजी डमाळे यांनी अण्णा हजारे यांच्या समोर पक्षाची विचारधारा स्पष्ट केली. प्रस्थापितांच्या घराणेशाहीमुळे लोकशाहीचे हुकुमशाहीत रूपांतर होत झालेले आहे. देशभक्त पार्टीने प्रस्थापित हटाओचा नारा दिलेला आहे. देशातील भ्रष्टाचार संपवून टाकण्यासाठी लोकपाल कायद्याची अंमलबजावणी आवश्‍यक असल्याची भुमिका पक्षाच्या वतीने मांडण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.