अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील कर्जाचे व्याज व पहिला हप्ता शासन भरणार: चंद्रकांत पाटील

संग्रहित छायाचित्र
कर्जाला शासनाची हमी : बँकांनी त्वरीत कर्ज उपलब्ध करुन द्यावे 
कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जासाठी कर्जदाराचे व्याज व कर्जाचा पहिला हप्ता शासन भरणार आहे. या कर्जतारण किंवा जामीनदार ही अट रद्द केली असून या कर्जाची हमी शासन घेणार आहे. तसेच यासाठी विमा संरक्षणही मिळणार त्यामुळे बँकांनी जिल्ह्यातील तरुण- तरुणींना व्यवसायांसाठी त्वरीत कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमांतून कर्ज मिळण्यासाठी जिल्ह्यातून सुमारे 1130 अर्ज प्राप्त झाल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या अर्जापैकी 192 कर्ज प्रकरणे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरीत कर्ज प्रकरणे संबंधित बँकांनी तातडीने मंजूर करावीत. यासाठी कर्ज मागणीदाराशी बँकांनी संपर्क साधून कागदपत्रांची पुर्तता करुन घ्यावी अशा सूचना देवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज अधिक गतीने होण्यासाठी या महामंडळास तातडीने कोल्हापूर शहरात अद्ययावत कार्यालय उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी महसूल व बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही करावी.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पुढील काळात विविध कल्याणकारी योजना अंमलात आणण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही सुरु आहे. ग्रामीण भागातील तरुण तरुणींना कर्जाचा लाभ मिळावा यासाठी अर्जदारांनी आपले अर्ज गावातील विकास सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे सादर करावेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)