अण्णांच्या उपोषणाला वाघोलीत पाठिंबा

वाघोली- हे राळेगण सिद्धी येथील यादवबाबा मंदिरात केंद्रात लोकपाल नियुक्‍ती, राज्यात लोकायुक्‍त कायद्याची अंबलबजावणी करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंबलबजावणी, वृद्ध शेतकरी बांधवांना पेन्शन, देशातील सर्वच शेतकरी बांधवांना पेन्शन मिळावी आदी मागण्यांसाठी जनतेच्या हिताच्या मागण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला वाघोलीतील कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. माहिती सेवा समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह समितीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी नुकतीच अण्णा हजारे यांची भेट घेतली. मात्र सरकारने अण्णांची कुठलीही मागणी मान्य न केल्याने मंगळवार (दि. 5) वाघोली केसनंद फाटा येथे माहिती सेवा समितीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, पुणे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे, नंदा जाधव, पार्थ नानेकर, शरद ढेरंगे, अंकुश कोतवाल, किशोर घुले, गणेश सातव यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपोषणास बसले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)