अणे पठारावर विहिरींनी गाठला तळ

अणे-जुन्नर तालुक्‍यातील अणे पठार भागावर मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याने टॅंकर सुरू करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. तर अनेक कुपनलिका बंद पडल्या आहेत. माळवाडी वस्ती, आनंदवाडी, तरळदारा, गोडेशेत, संभेराव वस्ती, हनुमान दरी, चिखल ओहळ, आंद्रे वस्ती, दाते मळा, चौघुले मळा, भटमोळी भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. येत्या आठ दिवसांत टॅंकर सुरू झाला नाही तर तीव्र रास्ता रोको करण्यात येईल, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य राजू आहेर यांनी दिली. महिलांना तीन ते चार किलोमीटर वरून पाणी आणावे लागत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्‍न नागरिकांसमोर आहे. या वेळी माळवाडीवस्ती वर नागरिकांनी एकत्र येऊन पाण्याच्या तीव्र प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्यांसमोर मांडल्या. या वेळी किशोर आहेर, राजू आहेर, प्रशांत आहेर, रामदास गंडाळ, नामदेव आहेर, छाया आहेर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

  • आम्ही ही गावातील सर्व ठिकाणची पाहणी केली आहे. खऱ्या अर्थाने पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट आहे. ग्रामपंचायतीचा पंचायत समितीकडे पत्र व्यवहार चालू आहे. लवकरातील लवकर टॅंकर सुरू करणार आहोत.
    -रामदास गंडाळ, ग्रामपंचायत सदस्य, अणे

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)