अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना ट्रम्प यांची 12 अब्ज डॉलर्सची मदत

वॉशिंग्टन – युरोपिय देश, चीन आणि भारत इत्यादी देशांनी अमेरिकेच्या व्यापार विषयक धोरणांना विरोध म्हणून अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या कृषी मालावर मोठ्या प्रमाणात कर लागू केले आहेत. त्यामुळे नुकसान झालेल्या अमेरिकेतील शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल 12 अब्ज डॉलर्सची मदत देण्याची योजना आखली आहे त्या योजनेची घोषणा लवकरच केली जाणार आहे अशी माहिती ट्रम्प प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

अमेरिकेतील शेतकऱ्यांनी अमेरिकेचे अन्य देशांशी जे व्यापार युद्ध सुरू आहे त्याचा आम्हाला फटका बसत असल्याची तक्रार केली आहे. विशेषत सोयाबिन आणि सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे चीन सारख्या देशांशी व्यापार युद्ध करू नका अशी विनंती ट्रम्प यांना करणारी अनेक पत्रे अमेरिकन संसद सदस्यांनी पाठवली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प प्रशासनाकडून हा निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे. चीनशी व्यापार विषयक स्पर्धेच्या बाबतीत तडजोड केली जाणार नाही असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे पण त्यामुळे शेतकऱ्यांना जे नुकसान सोसावे लागत आहे त्याची त्यांना भरपाई केली जाईल असेही ट्रम्प यांनी म्हटले होते. नुकसानभरपाईची ही मदत शेतकऱ्यांना थेट स्वरूपात दिली जाणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)