अटलजींच्या अस्थिकलशाचे हास्यदर्शन अस्वस्थ करून गेले – उद्धव ठाकरे  

उद्धव ठाकरेंचे भाजपवर भावनिक फटकारे ; भाजपचे अटलप्रेमाचे मुखवटे गळून पडले

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. भाजपचे जेष्ठ नेते व देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर त्यांचे अस्थिकलश दर्शनासाठी देशभर पाठवण्यात आले. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेतेमंडळीना शिवसेनेचे मुखपत्र सामनातून कडक शब्दात सुनावले आहे. “भाजपात ‘बुजुर्ग’ नेत्यांना महत्त्व राहिलेले नाही, पण त्यांच्या अस्थींना महत्त्व मिळत आहे. माणूस आपल्यातून निघून जातो तो शरीराने, पण त्याचा विचार पुढे नेणे हीच त्याला खरी श्रद्धांजली ठरते !” असे ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरे म्हणाले, “अस्थिकलश हाती घेऊन विजयी ट्रॉफी उंच करावी तसे फोटोसेशन काही ठिकाणी करण्यात आले. जणू विश्वचषक जिंकल्याचे हावभाव मंत्र्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. अटलजींचा अस्थिकलश हाती घेऊन लोक खदाखदा हसू कसे शकतात? हे सर्व हास्यस्फोट कॅमेऱ्यात कैद झाले. काहींनी तर अटलजींच्या अस्थिकलशासोबत सेल्फी काढण्याचा ‘पराक्रम’ केला. तोदेखील कॅमेऱ्यात टिपला गेला. या सर्व प्रकारांमुळे अटलप्रेमाचे मुखवटे गळून पडले !

नेत्यांचे मोठेपण हे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याने ठरत नाही. ते तर एक राजशिष्टाचाराचे कर्तव्यच आहे. अटलबिहारी वाजपेयींनी कधी द्वेषाचे आणि सूडाचे राजकारण केले नाही. विरोधकांच्या मुंडक्या उडवण्यासाठी त्यांनी सत्तेचा वापर केला नाही. अटलजींच्या निधनानंतर देशात जी शोकलहर निर्माण झाली त्या लहरीचा राजकीय व्यापार सुरू असल्याचे मत अटलजींच्या नातेवाईकांनीच व्यक्त केले, पण त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे अटलजींच्या अस्थिकलशाचे हास्यदर्शन अस्वस्थ करून गेले म्हणून हा प्रपंच. असा हास्यप्रपंच पुन्हा कोणाच्याही बाबतीत घडू नये !, असे भावनिक फटकारे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाजपवर ओढले. 

 

भाजपात ‘बुजुर्ग’ नेत्यांना महत्त्व राहिलेले नाही, पण त्यांच्या अस्थींना महत्त्व मिळत आहे. माणूस आपल्यातून निघून जातो तो शरीराने, पण त्याचा विचार पुढे नेणे हीच त्याला खरी श्रद्धांजली ठरते !

Δημοσιεύτηκε από Uddhav Thackeray στις Κυριακή, 26 Αυγούστου 2018

नेत्यांचे मोठेपण हे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याने ठरत नाही. ते तर एक राजशिष्टाचाराचे कर्तव्यच आहे. अटलबिहारी…

Δημοσιεύτηκε από Uddhav Thackeray στις Κυριακή, 26 Αυγούστου 2018

https://www.facebook.com/UddhavThackeray/posts/10156290213270660

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)