अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी चिदंबरम यांची धावाधाव

सत्र आणि दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल

नवी दिल्ली – एअरसेल मॅक्‍सिस व्यवहार आणि “आयएनएक्‍स’ मिडीयाशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी आज सत्र आणि दिल्ली उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल केल्या. या दोन्ही प्रकरणांमध्ये तपास संस्थांना सहकार्य करण्याची सूचना चिदंबरम यांना न्यायालयाकडून करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“युपीए 1′ सरकार सत्तेवर असताना केंद्रीय अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळातल्या 3,500 कोटींच्या एअरसेल मॅक्‍सिस आणि 305 कोटींच्या आयएनएक्‍स मिडीया प्रकरणांमधील चिदंबरम यांचा सहभाग तपासला जात आहे. अर्थिक अनियमितता आढळलेल्या या दोन्ही प्रकरणांना “फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड’कडून मंजूरी दिली गेली होती. एअरसेल मॅक्‍सिस व्यवहार प्रकरणी कथित मनी लॉंडरिंग झाल्याच्या आरोपावरून अंमलबजावणी संचलानलयाने चिदंबरम यांना आज चौकशीसाठी समन्स पाठवले होते. तर आयएनएक्‍स मिडीयाप्रकरणात सीबीआयने उद्या चौकशीची नोटीस बजावली आहे.

या दोन्ही प्रकरणांमध्ये अटक होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन चिदंबरम यांनी विशेष न्यायाधीश ओ.पी.सैनी यांच्या न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर एअरसेल मॅक्‍सिस प्रकरणी 5 जूनपर्यंत चिदंबरम यांच्यावर कोणतीही जबरदस्ती किंवा त्यांना अटक न करण्याची सूचना न्यायालयाने “ईडी’ला केली. तर चौकशीला सामोरे जाण्याची सूचना चिदंबरम यांना केली.

या सुनावणीनंतर लगेचच आयएनएक्‍स मिडीया प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला गेला. मात्र न्या. एस.पी. गर्ग यांनी हा अर्ज सुनावणीसाठी प्रभारी मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांच्याकडे वर्ग केला. न्या. मित्तल यांनी याची सुनावणी न्या. ए.के.पाठक यांच्याकडे सोपवली. न्या.पाठक या प्रकरणावर उद्या सुनावणी करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)