अज्ञात वाहनाच्या धडकेत भिक्षेकरी महिला ठार

पुणे- अज्ञात वाहनाच्या धडकेत एक 70 वर्षीय भिक्षेकरी महिला ठार झाली. ही घटना शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाच्या गेट समोर घडली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास एक 70 वर्षीय भिक्षेकरी महिला कचरा कुंडीजवळ मृतावस्थेत आढळली. भरधाव वेगात आलेल्या वाहनाने तीला ठोकरल्याने ती गंभीर जखमी झाली होती.
यासंदर्भात माहिती देताना पोलीस उपनिरीक्षक गिरी यांनी सांगितले, स्थानिक रहिवाशी राजेश काची यांनी फिर्याद दिली आहे. मागील आठवडयात संबंधीत महिलेला कोणीतरी या परिसरात आणून सोडले होते. परिसरात रस्ता अरुंद असल्याने नेहमी तेथे वाहतूकीची वर्दळ असते. रात्री एखाद्या वाहनाने महिलेला उडवले असल्याची शक्‍यता आहे. सकाळी ती मृतावस्थेत आढळली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)