अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

भुईंज, दि. 2 (प्रतिनिधी) – ग्वाल्हेर बंगळूर आशियाई महामार्गावर अनवडी, ता. वाई गावच्या हद्दीत महामार्ग ओलांडत असलेल्या अनवडी येथील पादचाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. मिलिंद जग्गनाथ मोरे असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सातारा पुणे महामार्गावरून पाई चालत जात असताना अनवडी, ता.वाई येथील रहिवाशी मिलींद जगन्नाथ मोरे (वय 45) हे हॉटेल अलंकार समोरील असणारा दुभाजक ओलांडून अनवडी गावाच्या दिशेने निघाले होते. यावेळी पुणे सातारा बाजूकडील टाकूबाईमाळाच्या तीव्र असणाऱ्या उतारावरून भरगाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिल्याने त्यात ते गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मुत्यू झाला. दरम्यान, धडक देणारे वाहन न थांबताच पळून गेले आहे.
या अपघाताची माहिती भुईंज पोलीस स्टेशन हवालदार विजय अवघडे यांना मिळताच ते आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून आधिक तपास हवालदार विजय अवघडे करीत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here