अज्ञात चोरट्यांनी सहा दुकाने फोडली

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पुर्व भागातील पिंपळगाव खडकी येथे गुरूवारी (दि. 26) पहाटे अज्ञात चोरटयांनी सहा दुकानांची शटर उचकटुन चिल्लर, रोकड आणि मोबाईल चोरून नेले आहेत. या घटनेत एकुण 6 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे दुकानदारांनी सांगितले.
पिंपळगाव गावातुन खडकी फाटा येथे जाणाऱ्या रस्त्यालगत आर. के. शॉपींग सेंटर आहे. त्यामध्ये रविंद्र कृष्णाजी पोखरकर यांचे आर. के. जनरल स्टोअर आहे. गुरुवारी चोरट्यांनी शटर उचकटुन गल्लयातील 50 रूपयांची चिल्लर चोरून नेली आहे. त्यांच्या शेजारील गणेश बांगर यांचे ही दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. परंतु, त्यांच्या हाती काही लागले नाही. अभिमन्यु पोखरकर यांचे मुक्ताई कृषी उद्योग या दुकानाचे शटर उचकटुन 1500 रूपयांची रोकड चोरटयांनी चोरून नेली आहे. पिंपळगाव गावठाणातील शिवाजी चौकातील आयुषकुमार किराणा दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटुन 5 हजार रूपयांची चिल्लर, मोबाईल आणि बॅकेचे पासबुक चोरून नेले आहे. याशिवाय चोरट्यांनी दत्तगुरू आईस्क्रीम आणि गणेश पोखरकर यांच्या किराणा दुकानाचे शटर उचकटले. परंतु, चोरटयांना तेथे काही मिळाले नाही.
घटनास्थळी पोलिस पाटील बबुशा वाघ यांनी भेट देवुन पहाणी केली. दरम्यान मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी श्रीराम दूध संस्थेत ग्रामस्थांची बुधवारी (दि. 25) बैठक आयोजित केली होती. त्यांनी रात्रीची गस्त सुरू करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले होते. तसेच राज्यात सुरू असलेल्या विविध आंदोलनाबाबत माहिती देवुन शांततेचे आवाहन केले. त्यानंतर आठ ते नऊ तासांनी चोरीची घटना घडली आहे.पोलिसांनी रात्रगस्त पथक सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)