अजूनही भुयारी मार्गाचे काम अर्धवट

रहाटणी – उद्‌घाटन होऊन दोन वर्षे उलटून गेली तरीही काळेवाडी डी-मार्ट येथील भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले नाही. केवळ लोकप्रियता आणि श्रेयासाठी भुयारी मार्गाचे उद्‌घाटन करण्यात आले की काय? असा सवाल नागरीक उपस्थित करीत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात उद्‌घाटन झालेल्या भुयारी मार्गाचे काम भाजपने देखील अद्याप पूर्ण केले नसल्याने नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे.

2017 मध्ये महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना एकीकडे विरोधकांकडून आरोपांच्या फेऱ्या झडत होत्या, तर दुसरीकडे सताधाऱ्यांकडून उद्‌घाटनांचा धडाका लावण्यात आला होता. त्याच स्थितीत काळेवाडी येथील डी-मार्ट जवळील भुयारी मार्गाचे उद्‌घाटन करण्यात आले. तात्कालीन उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी या भुयारी मार्गाचे उद्‌घाटन केले होते. अर्धवटच कामाचे उद्‌घाटन केले म्हणून सोशल मीडियावरुन देखील खिल्ली उडवण्यात येत होती. आज उद्‌घाटन होऊन दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत, परंतु अद्यापही स्थिती तशीच आहे. जे काम राष्ट्रवादी कॉंग्रेसला पूर्ण करता आले नाही, ते भाजपनेही सत्तेत येऊन पूर्ण केले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उद्‌घाटनावेळी येथील एका भुयारी मार्गिकेत एका बाह्य रेलिंगवर शेड बसवण्यात आले नव्हते आणि ते आजही अपूर्णच आहे. नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी बनवण्यात आलेल्या भुयारी मार्गास एकूण तीन मार्गिका आहेत. एक डी-मार्टच्या बाजूने राहटणीकड़े जाणारा रस्ता, बीआरटीतून रहाटणीकड़े व डी-मार्टकड़े. राहटणीकड़े जाणाऱ्या मार्गिकेवर अद्याप शेड बसवण्यात आले नाही. यामुळे भुयारी मार्गातही काम पूर्ण झाल्यापासून शेड लावण्यात अली नाही. या कारणाने नागरिकांना ऊन व पावसाचा त्रास सहन करवा लागत आहे. पावसाळ्यात तर पाणी सरळ भुयारात पडत असल्यामुळे नागरिकांची चांगलीच तरांबळ होते; परन्तु आता सत्तेत आलेल्या बीजेपीला हेच अर्धवट काम कधी पूर्ण करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)