अजूनही नाले सफाई निविदेच्या टप्प्यावर

वसाहतीत पाणी शिरण्याची शक्‍यता
नगर – सीना सफाईचे अभियान सध्या जोरदार सुरू आहे. तशी त्याची चर्चाही चांगलीच रंगली आहे. जिल्हाधिकारी आयुक्त असल्याने ही मोहीम अजून तरी विना अडथळा सुरू आहे. परंतु पावसाळा जवळ आलेला असून अद्याप नाले सफाईचे काम सुरू झालेले नाही. उशीर झाल्यास हे काम करण्यास पावसाचा अडथळा येऊ शकतो.
दै.प्रभात ने या समस्येकडे सर्वात प्रथम लक्ष वेधले होते. शहरातील नाल्यांमध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरलेली आहे.त्यामुळे पाण्याचा प्रवाह तुंबला जात आहे. अशीच स्थिती इतर नाल्यांचीही आहे. मानवनिर्मिती कचरा अनेकनाल्यांच्या पाईपच्या तोंडाशी पडला आहे. त्यामुळे अरूंद झालेल्या पाईमधून पाणी वाहून जाण्याचे प्रमाण घटले आहे.
वेळीच नाल्यांची सफाई केली गेली नाही तर पावसाच्या पाण्याबरोबरच गटाराचे पाणीही नागरी वस्तीत शिरून आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होण्यची शक्‍यता आहे. याबाबत महानगरपालिकेच्या चौकशी केली असता, शहरात एकूण 15 नाले आहेत. त्यांच्या सफाईला दोन महिने लागतात. तर त्यावरील संभाव्य खर्च वीस लाख रूपये आहे. यासाठी निविदा मनपाने निविदा काढली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)