अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 75 जणांनी केले रक्‍तदान

पिरंगुट- येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयात माजी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या विविध समाजोपयोगी, विद्यार्थी केंद्रित कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे उद्‌घाटन जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यांच्या हस्ते झाले.
रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी 75 जणांनी रक्तदान केले. हडपसर येथील घोलप रक्तपेढी यांच्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले. भौतिकशास्त्र विभागातर्फे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यात एकूण 40 प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. कला, वाणिज्य, विज्ञान आणि संगकशास्त्र विभाग यांच्यामार्फत प्लास्टिक बंदी, पर्यावरण, लेक वाचवा, लेक शिकवा, आधुनिक शिक्षण पद्धती, स्त्री सुधारणा या सारख्या विषयांवर रांगोळी, वक्तृत्व, भिंती चित्रे स्पर्धा तसेच स्पर्धा परीक्षा करीत विद्यार्थी क्षमता लक्षात घेण्यासाठी अभियोग्यता चाचणी घेण्यात आली.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण केले. प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. नीता कांबळे, प्रा. मीनाली चव्हाण, प्रा. तुकाराम चव्हाण, डॉ. विजय घाडगे, प्रा. अनिल मरे, डॉ. अभय पाटील, डॉ. क्रांती बोरावके, डॉ. स्मिता लोकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)