अजय देवगणच्या मुलाचे जबरदस्त स्टंट; सोशल मीडियावर खलबली

केंद्रीयमंत्री राजवर्धन राठोड यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत नागरिकांनी फिट राहण्यासाठी आवाहन केले होते. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी हे आवाहन स्वीकार करत सोशल मीडियावर आपआपले व्हिडिओ शेअर केले होते. राजवर्धन राठोड यांच्यानंतर आता अजय देवगणचा मुलगा युग याने “यंग इंडिया’ अर्थात भारतातील तरुणांना फिटनेस चॅलेज दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अजय देवगण याने त्याच्या मुलाचा एक व्हिडिओ ट्‌विटरवर शेअर केला असून त्यात युगने जबरदस्त फिटनेस स्टंट करून दाखविले आहे. या व्हिडिओच्या शेवटी एक सूचनाही देण्यात आली आहे की, मुलांनी हे स्टंट त्यांच्या प्रोफेशनल ट्रेनरच्या उपस्थितीतच करावे.

अजय देवगणने ट्विट केले की, “युग का यंग इंडिया को हम फिट तो इंडिया फिट फिटनेस चॅलेंज!’ या व्हिडिओतील युगचे स्टंट खूपच आश्‍चर्यकारक असे आहेत. एवढ्या कमी वयात युगने केलेले हे स्टंट लोकांना खूपच आवडले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून अनेकांच्या कॉमेंट्‌स येत आहेत. एका सोशल मीडिया युजरने तर युगची तुलना थेट टायगर श्रॉफशी करत ट्‌विट केले की, “या वयात असा स्टंट? तो टायगर श्रॉफला नक्‍कीच टक्कर देईल.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)