अजयला हे महागात पडणार आहे – काजोल

काजोलच्या फॅन्सना सोमवारी आश्‍चर्याचा सुखद धक्काच बसला. अजय देवगणने ट्विटरवर आपल्या पत्नीचा चक्क मोबाईल नंबरच शेअर करून टाकला होता. सर्व साधारणपणे कोणीही सेलिब्रिटी आपला किंवा अन्य सेलिब्रिटीचा मोबाईल नंबर अशा प्रकारे उघडपणे शेअर करत नाहीत. म्हणूनच काजोलला आणि तिच्या फॅन्सना हा आश्‍चर्याचा धक्का बसला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“काजोल सध्या भारतात नाही. तिच्याशी संपर्क साधायचे असेल तर 9********0 या व्हॉट्‌स ऍप क्रमांकावर संपर्क करावा.’ असा मेसेज अजयने ट्विटरवर लिहीला होता. लवकरच हे ट्विट व्हायरल झाले पब्लिकने काजोलचा नंबर शेअरही करून घेतला. तिला थेट मेसेजही करायला सुरुवात केली तर काहींनी अजयच्या ट्‌विटचे स्क्रीन शॉटही शेअर केले.

आपल्या बायकोचा नंबर अनवधानाने का होईना पण अशा प्रकारे शेअर केल्याबद्दल अजयवर शेरेबाजीही सुरू झाली. काहींना हा अजयने केलेला एक विनोद असावा, असे वाटले, तर काहींना हा अजय आणि काजोलचा पब्लिसिटी स्टंट आहे, असे वाटले.

आपल्याकडून काय चूक झाली, हे लक्षात येऊनही अजयने हे ट्विट डिलीट केले नव्हते, हे विशेष. फॅन्सनी ट्विटवर प्रचंड गोंधळ घालायला लागल्यावर काजोलला या प्रकाराला उत्तर द्यावेच लागले. “”हा चांगला विनोद निश्‍चितच नाही. अजयला हे महागात पडणार आहे. त्याच्यासाठी घरात “नो एन्ट्री’ असेल.’ असे दम देणारे ट्विट तिने पोस्ट केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)