अग्निहोत्राचे महत्त्व 

“यज्ञ’ हा अतिप्राचीन काळापासून उपासना -विधी म्हणून दिलेला असला, तरी त्यांच्या सृजनात्मक शक्‍तीमुळे तो चिकित्सा किंवा थेरपी म्हणून देश-विदेशात वापरला जाऊ लागला आहे, ज्याला आयुर्वेदाने भेषज यज्ञ म्हणून संबोधलेले आहे, वाढत्या भौतिक विकासाबरोबरच पर्यावरण प्रदूषण व त्याचबरोबर मनो शारीरिक व्याधींचाही विकास होताना दिसत आहे आणि त्यावर उपाय म्हणून नित्य नैमित्तिक यज्ञ-हवन हा अनुभवांवर आधारलेला खात्रीलायक उपाय आहे.

उदा. नित्याचा यज्ञ जो अग्निहोत्र त्यातील औषधी वायूंमुळे परिसरातील वातावरण शुद्ध व रोगाणूमुक्‍त राहात असल्याचे पुणे-मुंबई-कानपूर-प. जर्मनी इत्यादी अनेक ठिकाणी वारंवार झालेल्या प्रयोगातून स्पष्ट झालेले आहे. आज अनेक ठिकाणी स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया व तत्सम विकार वारंवार पसरताना दिसत आहेत. तर वातावरण रोगाणूंच्या-कीटकांच्या वाढीस प्रतिबंध करण्याचे काम नित्याचा यज्ञ-अग्निहोत्र करतो, म्हणून जीवनपद्धतीत त्याला महत्त्वाचे स्थान आहे व आज 80 पेक्षा जास्त देशात वातावरण शुद्धी, तणावमुक्‍ती, व्यसनमुक्‍ती, सकस सेंद्रीय शेतीसाठी त्याचा अवलंब होत आहे. बाह्य औषधे, गोळ्या, इंजेक्‍शने यापेक्षा धूपना श्‍वासावाटे घेण्याचे औषधी वायू रोग निवारणास सर्वाधिक प्रभावी व जलद परिणाम करणारे असतात. हे केवळ योग्य प्रकारच्या हवनानेच शक्‍य आहे! केरळमधील बेकाळ येथील अत्यंत महागडे व आयुर्वेदिक उपचार देणारे ताज हॉटेल येथे पद्धतशीरपणे यज्ञ-थेरपी वापरली जाते. येथे उपचार करून घेण्यासाठी विशेषतः विदेशातील धनवान लोक कायम येत असतात व रोगमुक्‍त होऊन जातात! स्वतःच्या व निसर्गाच्या आरोग्याचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी प्राचीन शास्त्राने आवश्‍यक म्हणून दिलेला नित्याचा अग्निहोत्र, घराघरांत सुरू होणे, आता जरूर आहे!
– श्‍यामसुंदर गंधे, पुणे 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)