अगोती आणि वरकुटे बुद्रुक येथे विकासकामांना सुरुवात

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील अगोती क्र. 1, 2, 3 आणि वरकुटे बुद्रुक या ठिकाणच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आणि पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
बुधवारी (दि. 13) सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर कृषी उत्त्पन्न बाजर समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, सोनाई परिवाराचे दशरथ माने, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब घोलप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यामध्ये अगोती क्र. 1 व 2 येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे प्रत्येकी 12 लाख, अगोती क्र. 1 येथे सिमेंट रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 10 लाख, अगोती क्र. 2 येथे सिमेंट रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 13 लाख, अगोती क्र. 2 येथे हनुमान मंदिर ढुकेवस्ती येथे सभामंडप बांधणे 12 लाख, अगोती क्र. 2 येथे लक्ष्मीदेवी मंदिर सभामंडप बांधणे 3 लाख, वरकुटे बु. ते भैरवनाथ मंदिर रस्ता तयार करणे 12 लाख, वरकुटे बु. येथील शिवाजी विद्यालयास वर्ग खोल्या बांधणे 10 लाख अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहेत. यावेळी समस्त ग्रामस्थ अगोती क्र. 1, 2, 3 आणि वरकुटे बुद्रुक येथील नागरिकांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)