अखेर हिंजवडी पोलिसांना जाग

– 16 दिवसानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पिंपरी – पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी खरडपट्टी काढल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी तब्बल 16 दिवसांनी महिला वसतीगृहातील विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिंजवडी येथील एका महिला वसतीगृहात पीडिता ही पहाटे पावणे चार वाजता वॉशींग मशीनमधील कपडे वाळत घालण्यासाठी तळमजल्यावर आली असता तेथे आधीच दबा धरुन बसल्या एका अज्ञात इसमाने तिला मिठी मारत अश्‍लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला व प्रतिकार केला असता पीडितेला ढकलून देऊन जखमी केले. हा प्रकार सीसीटिव्हीमध्येही कैद झाला होता. याची तक्रार देण्यासाठी हिंजवडी पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी फिर्यादी यांनाच चार तास ताटकळत ठेवले व गुन्हा दाखल करुन घेतला नाही.

यामुळे त्रस्त झालेल्या पीडितेने पोलीस आयुक्त पद्मनाभन यांना थेट वकीलामार्फत नोटीस बजावली. सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांनी पीडितेशी असभ्य भाषा वापरल्याचेही त्यात नमूद होते. आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत ननावरे यांची बदली केली. तसेच पोलीस निरीक्षक व इतर पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)