अखेर सर्वोच्च न्यायालयासमोर अनिल अंबानींचे लोटांगण

मुंबई –

रिलायन्स कम्युनिकेशनच्या अनिल अंबानी यांनी एरिएक्सन कंपनीची ५५० कोटींची थकीत रक्कम आज सोमवारी चुकती केली. यामुळे अनिल अंबानी यांच्यावर असणारी अटकेची टांगती तलवार दूर झाली आहे. २० फेब्रुवारी २०१९ रोजी अनिल अंबानी यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने, कोर्टाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत ४ आठवड्यांच्या आत थकबाकी जमा न केल्यास ३ महिन्याचा कारावास भोगावा लागेल असे म्हंटले होते. रिलायन्स कम्युनिकेशन आणि एरिएक्सन यांच्यात झालेल्या कराराची थकीत रक्कम आणि व्याज यासंदर्भात एरिएक्सनने रिलायन्स कम्युनिकेशन्सला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. तसेच न्यायालयाच्या अवमान प्रकरणी अनिल अंबानी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी १ कोटी रुपये दंड देखील ठोठावला होता.

सोमवारी म्हणजे आज एरिएक्सन कंपनीची ५५० कोटींची थकीत रक्कम दिल्यानंतर रिलायन्स कम्युनिकेशनचे चेअरमन अनिल अंबानी यांनी आपले मोठे भाऊ मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे आभार मानले.

 

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)