अक्षय आढळराव पाटलांनी साधला मतदारांशी संवाद

मंचर – आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव येथील ग्रामस्थांशी शिवसेनेचे युवानेते अक्षय आढळराव पाटील यांनी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना युवानेते व डायनालॉग इंडियाचे कार्यकारी संचालक अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने पिंपळगाव(खडकी) येथील प्रत्येक वाडीवस्तीवर जाऊन घोंगडी बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधला.

उमेदवार राजाराम बाणखेले यांना विक्रमी मताधिक्‍य देण्यासाठी अक्षय आढळराव पाटील यांनी आवाहन केले. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, युवासेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर, शिवसेना नेते वसंत राक्षे, उपतालुकाप्रमुख सोपान पोखरकर, विभागप्रमुख दीपक पोखरकर, उपतालुका युवा अधिकारी राहुल पोखरकर, विभागप्रमुख विठ्ठल बांगर, शिवाजी पोखरकर, शाखाप्रमुख कैलास पोखरकर, भगवान बांगर, विकास बांगर, आकाश पोखरकर, आयटी सेल तालुका संघटक देविदास आढळराव पाटील, अभिलाष घेवारी, सरोज बांगर, निलेश राक्षे, स्वप्निल बांगर, राहुल बांगर, स्वप्निल बांगर, किरण पोखरकर, अंकुश शेवाळे, गेनभाऊ पोखरकर यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.