अक्रोडच्या सेवनाने पोट आरोग्यदायी राहण्यास मदत

युरोपात केले गेलेले नवीन संशोधन सांगते की अक्रोडचे सेवन पोटामध्ये उत्तम प्रमाणात प्रोबायोटिक-टाइपच्या जीवाणूची वाढ करण्यासह पचनविषयक आरोग्यासाठी गुणकारी ठरू शकते. एक अक्रोड जीवाणूची वाढ होण्यासोबतच त्याला पोषण मिळण्यामध्ये मदत करण्याकरिता प्रीबायोटिकप्रमाणे कार्य करतो. हे जीवाणू पचन यंत्रणेला आरोग्यदायी ठेवतात. संशोधकांनी शोध लावला की अक्रोड असलेला आहार पोटामध्ये विविध गुणकारी जीवाणूंची निर्मिती करण्यामध्ये लाभदायी ठरतो. प्राण्यावरील या संशोधनामध्ये, उंदरांना 10 आठवड्यांपर्यंत मानवांमधील प्रतिदिन सुमारे 2 औंसशी (अर्धा कप) समानुपाती असलेले अक्रोडयुक्‍त आहाराचे, तसेच विना अक्रोडयुक्‍त आहाराचे सेवन करण्यास देण्यात आले. दोन्ही आहार गटांमधील कॅलरी व पोषणाचे प्रमाण समान होते. अक्रोड नसलेल्या आहाराचे सेवन केलेल्या उंदरांच्या तुलनेत अक्रोडयुक्‍त आहाराचे सेवन केलेल्या उंदरांमध्ये गुणकारी जीवाणूची वाढ दिसून आली, ज्यामध्ये लॅक्‍टोबॅसिलस, रोजबीरिया व रुमिनोकॉक्‍साई यांचा समावेश होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)