अकरावीच्या 37 महाविद्यालये सुरु होण्याचा मार्ग मोकळा

70 टक्‍क्‍याहून अधिक प्रवेश पूर्ण: अनेक महाविद्यालयांमधील वर्ग सुरु
पुणे- अकरावी प्रवेश प्रक्रियेदरम्यान अद्याप तिसऱ्या फेरीतील प्रवेश जाहीर झालेले नसले तरीही आतापर्यंत शहरातील बहुतांशी महाविद्यालये सुरु झाली असून 37 महाविद्यालयांना वर्ग सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान यंदा प्रवेश प्रक्रिया सुरु होण्याआधीच प्रवेश समितीने कधी वर्ग सुरु करावेत याची नियमावली ठरवली होती. त्याप्रमाणे ज्या महाविद्यालयांमध्ये 70 टक्‍क्‍यांहून अधिक प्रवेश पूर्ण झाले आहेत असे सर्व महाविद्यालय अकरावीचे वर्ग सुरु करत असल्याचे समितीने सांगितले होते. त्यानुसार दुसऱ्या फेरीअखेर शहरातील 37 महाविद्यालयांमधील प्रवशे हे 70 टक्‍क्‍याहून अधिक झाले आहेत. त्यामध्ये विद्या भवन ज्युनियर कॉलेज, सिंबायोसिस कॉलेज, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, लक्ष्मणराव आपटे प्रशाला, मॉर्डन हायस्कूल, अबेदा इनामदार, बीएमसीसी, रेणूका स्वरुप, साधना विद्यालय, नुमवि, नेस वाडिया, एस.एम.जोशी महाविद्यालय, हुजूरपागा हायस्कूल, भारत इंग्लिश स्कूल, एस.पी कॉलेज, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, सेंट उर्सुला हायस्कूल, जयहिंद कॉलेज आदी महाविद्यालयांचा समावेश आहे.
अकरावी केंद्रीय प्रवेश समितीची तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी (31 जुलै) सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच शहरातील अनेक नामांकित महाविद्यालयतील प्रवेश पूर्ण झाले आहेत. तर आतापर्यंत केवळ दोन महाविद्यालयांनी महाविद्यालय सुरु झाल्याचे पत्राद्वारे आम्हाला कळविले असल्याचे अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या प्रभारी अध्यक्षा मिनाक्षी राऊत यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)