अंबाबाई मंदिरात “कुंकुमार्चन’ उत्साहात

केरळातील पुरग्रस्तांसाठी 10 लाखांचा निधी
कोल्हापूर – पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अंबाबाई मंदिरातील गारेच्या गणपती चौकात कुंकुमार्चन विधी उत्साहात झाला. यात 750 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. तर देवस्थान समितीतर्फे केरळातील पुरग्रस्तांसाठी 10 लाखांचा निधीही जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला.

अंबाबाई मंदिरात प्रत्येक शुक्रवारी देवस्थानतर्फे गरुड मंडप येथे देवीचा कुंकुमार्चन विधी संपन्न होतो. त्यास महिलांचा मोठा प्रतिसाद लाभतो. त्यात दररोज हजारो महिलांची या विधीसाठी समितीकडे नाव नोंदणी होते. जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ घेता यावा, यासाठी समितीतर्फे शुक्रवारी दुपारी 501 महिलांकरिता हा विधी आयोजित करण्यात आला होता. त्यात 750 हून अधिक महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या उपक्रमात सहभागी महिलांना “श्रीयंत्र’, हळद-कुंकू, प्रसाद आणि साहित्य देवस्थानतर्फे पुरवण्यात आले होते. एकाचवेळी 750 हून अधिक महिलांनी एकत्रितपणे कुंकुमार्चनमध्ये सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)