अंबरनाथमध्ये मनसे कार्यकर्त्यांची परप्रांतीय कर्मचाऱ्यांना मारहाण

अंबरनाथ – एएसबी इंटरनॅशनल कंपनीतील मराठी कामगारांना कामावरुन काढल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीमधील परप्रांतीय कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या प्रकारानंतर कंपनी परिसरात काही काळ तणाव होता.

कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्यानंतर मनसेने निवेदन देऊन चर्चा करुन तोडगा काढायचा प्रयत्न केला होता. मात्र कंपनी प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी एएसबी कंपनीच्या परप्रांतीय कामगारांना गाठत मारहाण केली आणि त्यांना पळवून लावले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एएसबी कंपनी स्थानिकांना कामावरुन काढून त्यांच्या जागी परप्रांतीयांना कामावर घेते. तसेच अंबरनाथमध्ये भाड्याचे फ्लॅट घेऊन ते या कर्मचाऱ्यांना देते, असा मनसेचा आरोप आहे. असेच भाड्याने राहणारे कामगार अंबरनाथच्या ग्रीनसिटी भागात सेकंड शिफ्टसाठी कंपनीत जात होते. त्यावेळी बसची वाट पाहात उभे असताना मनसे विद्यार्थी सेनाच्या कार्यकर्त्यांनी या कामगारांना गाठून मारहाण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)