अंत्यसंस्काराच्या वेळी केलेल्या हल्यात 6 जणांचा मृत्यु

मोरेलिया – मेक्‍सिको येथील पश्‍चीम मिचोहकॅन प्रांतातील मोरेलिया गावात एका अंत्यसंस्कारावेळी करण्यात आलेल्या गोळीबार आणि बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यु झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली असून आता पर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगीतले.

याच ठिकाणी एका युवकाची गोळी मारुन हत्या करण्यात आली होती, त्या युवकाच्या अंत्यसंस्कारासाठी हे सर्व लोक तिथे जमा झालेले असताना हा हल्ला घडवून आणण्यात आल्याची माहिती स्थानीक प्रसिद्धी माध्यमांनी दिली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी शहरांमध्ये शोध मोहीम सुरू केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मिचोहकॅन प्रांत हा एकेकाळी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ तस्करीसाठी प्रसिद्ध असलेला भाग होता, या भागातुन अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी केली जायची. त्याचा एक मोठा गट कार्यरत होता. मात्र, पोलिसांनी याठिकाणी राबवलेल्या कारवाईनंतर हा गट मोडकळीस आला. आणि आता याठिकाणी अंमली पदार्थ तस्करी करणारे छोटे छोटे गट तयार झाले आहेत. त्या गटांमध्ये वर्चस्वाच्या लढाईतुन अशा प्रकारचे हल्ले होत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार आंमली पदार्थ तस्करी प्रकरणी मेक्‍सिकोमध्ये 2006 पासून 2 लाखांवर लोकांचा मृत्यु झाला असून चालु वर्षात आता पर्यंत 15,973 जणांचा बळी गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)